Taapsee Pannu sangeet dance video:
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने दीर्घकाळाचा प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत गुप्त लग्न केल्याची बातमी होती. आता सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात दावा केला जात आहे की ते अभिनेत्रीने गुप्त लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वी तापसीच्या लग्नाचा वीडियो वायरल झाला होता आता तिच्या संगीत समारंभाचा वीडियो वायरल होत आहे.
हे व्हिडिओ संगीत सोहळ्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंमध्ये तापसी तिची बहीण शगुन पन्नू आणि पती मॅथियाससोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओंबाबत दावा करण्यात आला आहे की, हे अभिनेत्रीच्या संगीत रात्रीचे व्हिडिओ आहेत. मात्र, अद्याप या दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, तापसी ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘मुझको हुई ना खबर..’ या गाण्यावर बहिण शगुनसोबत नाचताना दिसली.
Taapsee Pannu Wedding: लग्नाचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Taapsee Pannu Wedding Video: याआधी बुधवारी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तापसी वधूच्या पोशाखात नाचताना आणि स्टेजवर उभ्या असलेल्या मथियाकडे जाताना दिसत आहे. यामध्ये तापसीने लाल रंगाचा सूट आणि भारी दागिने घातले होते. मथियास शेरवानी आणि पगडी घालून स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. नंतर दोघे एकत्र नाचताना दिसले.
Taapsee Pannu And Mathias Bo Wedding: 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये झाले गुप्त लग्न:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसीने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड मॅथियासशी लग्न केले. 36 वर्षीय तापसी आणि 43 वर्षीय मथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
तापसी नवरा मॅथितयास हा डॅनिश बॅडमिंटनपटू आहे.
Mathias Bo: मॅथियास हा डेन्मार्कचा ऑलिम्पिक पदक विजेता बॅडमिंटनपटू आहे. 2020 मध्ये त्याने बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली. एका मुलाखतीत तापसीने सांगितले होते की, जेव्हा तिने तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘चश्मे बद्दूर’ ची शूटिंग सुरू केली तेव्हा ती मॅथियासला भेटली होती. वर्क फ्रंटवर तापसीचा शेवटचा चित्रपट ‘डिंकी’ होता, ज्यामध्ये ती शाहरुख खानसोबत दिसली होती. आगामी काळात ती ‘वो लड़की है कहाँ?’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘खेल खेल में’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.